वेंगुर्ला /-
पंचायत समिती वेंगुर्ले येथे ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करणेत आली शासनाच्या आदेशानुसार ए.पी.जे अब्दुल कलाम यांना १९८१ साली पदमभूषण,१९९८ साली भारतरत्न पुरस्काराने सन्मानीत करणेत आले होते. देशाचे माजी राष्ट्रपती असलेले अब्दुल कलाम महान शास्त्रज्ञ होते, असे गौरवोउदगार पंचायत समिती सभापती अनुश्री कांबळी यांनी काढले. या कार्यक्रमास गटविकास अधिकारी उमा पाटील, कृषि अधिकारी विधाधर सुतार, पशुधन विकास अधिकारी डॉ.देसाई,गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी अधिकारी व पंचायत समिती चे सर्व अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.