पिंगुळी गुढीपूर येथील उमेश आटक कुटुंबियांना बाजारपेठ मित्र मंडळ कडून 23000 रुपयांची मदत.
पिंगुळी गुढीपूर येथील उमेश आटक यांना 2 महिन्यापूर्वी पुत्रप्राप्ती झाली. त्यामुळे श्री. आटक कुटुंब आनंदात होते. पण नवजात शिशूचे दोन्ही किडन्या बंद असल्याचे समजताच त्यांचा आनंदावर विरजन पडले. जन्मताच या चिमुकल्याचे दोन्ही किडन्या निकामी असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. त्यामुळे या चिमुकल्याला लघुशंका करण्यास त्रास होत आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद वालावलकर यांनी श्री. आटक यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. उमेश आटक यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. मोलमजुरी करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तरीसुद्धा आपल्या चिमुकल्याला होणाऱ्या वेदना बघून कर्ज काढून पैशांची जुळवाजुळव करून डॉक्टरांच्या सल्यानुसार उमेश आटक यांनी सांगलीला जावून शस्त्रक्रिया केली. त्याला सुमारे 75 हजार रुपये एवढा खर्च आला. आता त्या चिमुकल्यावर अजून एक शस्त्रक्रिया करायची आहे. त्यासाठी जवळ जवळ 2 लाख रुपये खर्च येणार होता.हि बातमी समजताच बाजारपेठ मित्र मंडळ कुडाळ यांनी रूपये 23000 ची मदत करून आटक कुटुंबियांना सहकार्य केले आहे.