गोव्याच्या सर्व सीमा तात्काळ खुले कराव्यात अन्यथा जनतेसाठी रस्त्यावर उतरू.

गोव्याच्या सर्व सीमा तात्काळ खुले कराव्यात अन्यथा जनतेसाठी रस्त्यावर उतरू.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचा ईशारा.

केंद्राच्या अनलॉक 4 च्या मार्गदर्शक सूचनां प्रमाणे गोवा-महाराष्ट्र आंतरराज्य सीमा तात्काळ खुल्या कराव्यात अन्यथा सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस येथील सर्वसामान्य जनतेसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी सांगितले. गेले पाच महिने कोविडच्या पार्श्वभूमीवर गोवा-महाराष्ट्राच्या सीमा बंद असल्याने सिंधुदुर्गातील हजारो युवक-युवतींना बेरोजगार व्हावे लागले. परंतु आज केंद्राने अनलॉक ०४ च्या नवीन मार्गदर्शक सूचनांप्रमाणे गोवा सरकारने सीमा खुल्या केल्या आहेत परंतु सिंधुदुर्ग प्रशासनाकडून मात्र फक्त पत्रादेवी गेट खुली केली जाते. मग सातार्डा, आरोंदा व दोडामार्गच्या सीमा बंद का ? असा संतप्त सवाल सामंत यांनी उपस्थित केला आहे.सिंधुदुर्ग प्रशासनाने तात्काळ गोवा-महाराष्ट्राच्या सीमेवरील पत्रादेवी प्रमाणे आरोंदा, सातार्डा व दोडामार्गच्या सीमा खुल्या न केल्यास येथील जनतेसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा अमित सामंत दिला आहे.

अभिप्राय द्या..