सिंधुदूर्ग जिल्हातील सर्व चिरेखाण व्यावसायिकांची अत्यंत महत्ववाची सभा १६ ऑक्टोबरला..

सिंधुदूर्ग जिल्हातील सर्व चिरेखाण व्यावसायिकांची अत्यंत महत्ववाची सभा १६ ऑक्टोबरला..

सिधुदुर्ग चिरेखाण संघटना अध्यक्ष श्री.प्रमोद कांबळी यांचे आवाहन.

सिंधुदुर्ग /-

सिंधुदूर्ग जिल्हातील सर्व चिरेखाण व्यावसायिकांची अत्यंत महत्ववाची सभा शुक्रवार दिनांका 16/10/2020 रोजी दुपारी ठिक 3.00 वाजता श्री.भराडी मंदिर चौके या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. तरी जिल्हातील सर्व चिरेखाण व्यावसायिकांनी उपस्थितीत रहावे असे आवाहन सिधुदुर्ग चिरेखाण संघटना अध्यक्ष श्री.प्रमोद कांबळी यांनी केले आहे.यावेळी शासनाने अल्प मुदतीचे गौण खनिज परवाने देणे बंद केलेले आहेत.या बाबत विचार विनिमय करून पुढील रणनिति ठरविण्यासाठी हि सभा आयोजित करण्यात आलेली आहे.या बाबत जर वेळीच दखल घेण्यात आली नाही.तर जिल्हात चालू असलेला एकमेव चिरेखाण व्यवसाय बंद पडून बेकारी वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तरी जिल्हातील सर्व चिरेखाण व्यावसायिकांनी या सभेमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..