अनुदान थकल्याने ग्रंथालय कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ!

अनुदान थकल्याने ग्रंथालय कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ!

मसुरे /-

महाराष्ट्र राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाना अनुदानाचा पहिला हप्ता अद्याप मिळाला नसल्याने ग्रंथालय कर्मचारी व संस्थाचालक आर्थिक अडचणीत सापडले असून ग्रंथालय कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे .

शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाना सन् २०२० – २०२१ या आर्थिक वर्षात मिळणारा अनुदानाचा पहिला हप्ता आँगस्ट/ सप्टेंबर महिण्यात मिळतो. परंतु सप्टेंबर महिना संपून गेला तरी अनुदान मिळाले नाही तसेच मिळण्याबाबतच्या कोणत्याही हालचाली सुध्दा दिसत नाही. मंत्रालय पातळीवर वित्त विभागामधून फाईल बाहेरच निघत नसल्याचे महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष रामेश्वर पवार यानी सांगितले.

याबाबत मंत्रालय पातळीवर ग्रंथालय कार्यकर्ते गेल्या मार्च महिण्यापासून सर्व आमदार तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची वारंवार भेट घेऊन अनेक वेळा निवेदने दिली. मार्च महिण्यात मिळणारे सन् २०१९ -२०२० या आर्थिक वर्षाचा दुसरा हप्ता तब्बल सहा महिण्यानी म्हणजेच सप्टेंबर महिण्यात देण्यात आला.शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाना दोन टप्प्यात अनुदान दिले जाते. मागील वर्षीचा वार्षिक अहवाल
शासनास ग्रंथालयानी ३० जून पर्यंत दिल्यानंतर आँगस्ट /.सप्टेंबर महिण्यात पहिला हप्ता ग्रंथालयाना दिला जातो. त्यानंतर ग्रंथालयानी लेखातपासणी करून लेखातपासणी अहवाल शासनास ३१ आँक्टोंबर पर्यंत सादर केल्यानंतर शासनाकडून जानेवारी ते फेब्रुवारी मध्ये ग्रंथालयाची तपासणी केली जाते. त्यानंतर मार्च महिण्यात अनुदानाचा दुसरा हप्ता वितरीत केला जातो. यामुळे ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांनासुध्दा सहा-सहा महिण्यानी पगार मिळतो. तुटपुंज्या पगारावर काम करणारे ग्रंथालय कर्मचारी शासनाच्या धोरणाला कंटाळले असून उग्रआंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत.

अभिप्राय द्या..