मुंबई /-
राज्य सरकारने मेट्रो आणि ग्रंथालयं सुरु करण्यासाठीही परवानगी दिली आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडून नवं परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. यामध्ये शाळा, महाविद्यालयं सुरु करण्यासाठी अद्यापही परवानगी देण्यात आलेली नाही, मात्र शिक्षकांना ५० टक्के उपस्थितीची मुभा देण्यात आली आहे.
परिपत्रकात देण्यात आलेल्या माहितीनुसार, शाळा, महाविद्यालयं तसंच शैक्षणिक आणि प्रशिक्षण संस्था ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार आहेत. तर मेट्रो आणि ग्रंथालयं सुरु करण्यासाठीही परवानगी दिली आहे. सर्व सरकारी आणि खासगी ग्रंथालयांना करोनासंबंधित नियमांचं पालन करुन काम सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. १५ ऑक्टोबरपासून ग्रंथालयं सुरु होणार आहेत. याशिवाय मेट्रोलाही टप्याटप्याने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
याशिवाय आठवडी बाजार भरवण्यासही परवानगी देण्यात आली आहे. १५ ऑक्टोबरपासून कंटेनमेंट झोनच्या बाहेर आठवडी बाजार भरवला जाऊ शकतो असं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे. याशिवाय दुकानं दोन तास अतिरिक्त उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे दुकानं सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरु राहू शकतात. राज्य सरकारने परिपत्रकात मुंबई लोकल तसंच धार्मिकस्थळांचा उल्लेख केलेला नाही.