मुंबई /-

राज्यपालांनी मंदिर उघडण्यासंबंधी लिहिलेल्या पत्रावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या उत्तरावर विरोधी पक्षातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते यांनी हे दुर्दैवी असल्याचं म्हणत टीका केली. यानंतर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीदेखील ट्विट करत महाराष्ट्रात बार आणि लिकर शॉप्स सगळीकडे सुरु झाली आहेत, मग मंदिरं काय डेंजर झोनमध्ये आहेत का? असा प्रश्न विचारला. दरम्यान त्यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेविरोधात शिवसेना महिला आघाडी आक्रमक झाली आहे.

शिवसेनेच्या सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी आम्ही तोंड उघडलं तर अमृता फडणवीसांना तोंड लपवायला जागा राहणार नाही असं म्हटलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी म्हटलं की, “अमृता फडणवीस कोण आहेत? आमदार,खासदार, नगरसेविका की प्रवक्त्या..त्या माजी मुख्यमंत्र्याच्या पत्नी आहेत. त्यांनी त्याच भूमिकेत राहावं.खासदार, आमदार, नगरसेवक, प्रवक्ता असेल तर ऐकून घेऊ. पती मुख्यमंत्री झाल्यावर राजकारणात आलेल्यांनी आम्हाला शिकवू नये”.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page