उचकी थांबविण्यासाठी हा आहे घरगुती उपाय.;जाणून घ्या..

उचकी थांबविण्यासाठी हा आहे घरगुती उपाय.;जाणून घ्या..

ब्युरो न्यूज /-

उचकी हा शहरी शब्द, तर गुचकी हा ग्रामीण शब्द, शब्द कुठलाही असो पण प्रोसेस सेम आहे. तर मंडळींहो. उचकी आली की कुणीतरी आठवण काढतय अस म्हटलं जातं पण असं काही नसतं. तर उचकी लागल्यावर साधारणपणे आपण पाणी पितो पण त्यापलीकडे जाऊन उचकी थांबवण्याचे इतर उपाय आम्ही सांगणार आहोत.

1•) उचकी पाणी पिल्यावर थांबते पण पाणी पिऊनही उचकी थांबत नसल्यास मोठा श्वास घ्या आणि थोडावेळ श्वास रोखून धरा. जेवण करताना उचकी लागली तरी हेच करा.
2•) आंबट पदार्थ खाल्याने देखील उचकी थांबते. उदारणार्थ कैरी, चिंच. लिंबू, टोमॅटो. घरात कैरी, चिंच या सिजनल पदार्थ घरात उपलब्ध नसतील तर एक चमचा लिंबाच्या रस आणि एक चमचा मध एकत्र करून खा.

3•) एक चमचा मीठ तोंडात ठेवा. मीठ जास्त प्रमाणात घेतल्याने उचकी थांबते पण जर तुम्हाला मीठ आवडत नसेल तर तुम्ही मिठाचं पाणी सुद्धा घेऊ शकता.
4•) आता सगळ्यात जबराट आणि हटके उपाय जवळपास पाणी नसल्यास उलटे अंक मोजा आणि अंक मोजत असताना श्वास जास्त वेळ रोखून धरा. किंवा नाचायला सुरुवात करा जेणेकरून तुमचं उचकीकडे दुर्लक्ष होईल.

अभिप्राय द्या..