मालवण /-

कांदळगाव ग्रामपंचायतच्या वतीने १४ व्या वित्त आयोगातून प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास संगणक व प्रिंटर प्रदान करण्यात आला त्याचा शुभारंभ कांदळगाव सरपंच उमदी उदय परब यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी उपसरपंच आनंद आयकर सदस्य रणजित परब सदस्या सौ अक्षता अमोल परब सौ माधवी महेंद्र कदम सौ श्रद्धा सत्यविजय कुंभार ग्रामसेवक सागर शिवाजी देसाई आरोग्य सेविका सौ दिव्या दत्ताराम पांजरी सिध्देश सुहास धुरी सौ स्वाती बाळकृष्ण बेलवलकर आणि सौ संध्या सुनील कांदळगावकर गजानन सुर्वे आशिष आचरेकर प्रसाद मेस्त्री रमण कदम अंगणवाडी सेविका सौ अपर्णा पाटकर दिपिका बागवे आदी उपस्थित होते.

उपकेंद्रास संगणक दिल्याबद्दल आरोग्य सेविका सौ पांजरी यांनी ग्रामपंचायतीचे आभार मानले. याही पुढे कांदळगाव आरोग्य उपकेंद्र अद्ययावत करण्यासाठी आपला प्रयत्न राहील अशी ग्वाही सरपंच सौ उमदी परब यांनी दिली. सुत्रसंचालन सौ दिव्या पांजरी आणि आभार सिध्देश धुरी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page