अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती-बागायतीची नुकसानभरपाई त्वरित द्या.;काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर

अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती-बागायतीची नुकसानभरपाई त्वरित द्या.;काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर

सावंतवाडी /-

सिंधुदुर्गात ९ ऑक्टोंबर ते १२ ऑक्टोंबर या चार दिवसांत पडलेल्या परतीच्या अवकाळी पावसाने सावंतवाडी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या शेती बागायतीचे हाता तोंडाशी असलेले पीक, वाळत टाकलेले पीक वाहून व कुजून गेलेले आहे.

तसेच बागायतीतील फळझाडे पडलेली आहेत. त्यामुळे तालुक्यातील सर्व शेती बागायतीच्या नुकसानीचा पंचनामा करून तातडीने नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी सावंतवाडी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

अभिप्राय द्या..