जलपर्यटन व्यावसायिकांच्या विविध मागण्यांचा प्रस्ताव बंदर कार्यालयाकडून वरिष्ठ कार्यालयास सादर..

मालवण /-

तारकर्ली पर्यटन विकास संस्थेमार्फत जलक्रिडा व्यावसाईकांच्या समस्येबाबत मालवण बंदर अधिकारी यांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा करून निवेदन सादर करण्यात आले.
कोरोना व्हायरस बरोबर गेले वर्षभर ओखी,क्यार,निसर्ग वादळाने संकटात असलेला किल्ला वाहतूक ,
बोंटीग,वॉटरस्पोर्ट, स्कुबा डायव्हिंग जलपर्यटन व्यावसाईक प्रचंड आर्थिक मेटाकुटीस आला आहे सदर व्यवसाय उभा राहण्यासाठी सरकारच्या मदतीची गरज आहे.
१) गेल्या वर्षीचा पूर्ण व्यवसाय बंद स्थितीत असल्याने चालु वर्षाची नौका सर्वेक्षण फी माफ करण्यात यावी.
2) इन्शुरन्स हा व्यवसायाईकांकडुन न स्वीकारता ज्यावेळी बंदर विभाग प्रत्येक जलक्रीडा करताना पर्यटकांकडुन कर आकारते त्याचवेळी रेल्वे,बि एस टी, एस टी अन्य विभागाप्रमाणे हा इन्शुरन्स प्रतिपर्यटकांकडुन आकारावा.
३)लेव्ही कर चालु वर्षी माफ करावा.
४) प्रति व्यक्ति १ लाख असलेला इन्शुरन्स वाढऊन प्रति व्यक्ति ५ लाख करण्यात आला तो पूर्वरत १ लाख करण्यात यावा.
५)प्रशासनाने सर्व जलक्रिडा व्यवसायाईकांची एकत्र मीटिंग घेऊन त्यांना मंजूर प्रवाशी क्षमत्येच्या किती टक्के प्रवाशी वाहतूक करावी या संबंधी चर्चा करून शासनाने अधिकृत परिपत्रक (sop) जाहीर करावे
६)व्यवसाय सुरू करताना आवश्यक कोव्हीड सुरक्षा किट सरकार मार्फत मोफत देण्यात यावे .
७)स्थानीक स्कुबा डायव्हिंग व्यवसाईकांस मान्यता द्यावी.
८)या वर्षीचा पर्यटन हंगाम व्यवस्थित न झाल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या व्यावसाईकांस आर्थिक मदत देण्यात यावी
वरील विषय मार्गी लागले तरच या शेत्रातील व्यावसाईक उभारी घेऊ शकतो त्यामुळे आपल्या मार्फत वरिष्ठ कार्यालयास सदर विषय मार्गी लागण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात यावा अशी विनंती करण्यात आली संस्थेच्या विनंतीस मान देऊन स्थानिक प्रशासनाने यांची त्वरित दखल घेऊन वरिष्ठ कार्यालयाला प्रस्ताव सादर केला आहे अशी माहिती टीटीडीएस अध्यक्ष श्री बाबा मोंडकर यांनी दिली यावेळी ,रवींद्र खानविलकर, मिलिंद झाड , दादा वेंगुर्लेकर , राजन कुमठेकर, मनोज खोबरेकर अन्य पर्यटन व्यावसाईक उपस्थितीत होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page