आता जिल्हय़ाबाहेरून येणाऱ्यांना होम क्वारंटाईन रहाण्याची गरज नाही .;पालकमंत्री उदय सामंत

आता जिल्हय़ाबाहेरून येणाऱ्यांना होम क्वारंटाईन रहाण्याची गरज नाही .;पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्ग /-

कोविडच्या नियमात मोठी शिथिलता आणण्यात आली असून आता जिल्हय़ाबाहेरून येणाऱ्यांना होम क्वारंटाईन ठेवण्यात येणार
नाही, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यानी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यात आता कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत आहे. मात्र, मृत्यूदर कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेत सुधारणा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हय़ाबाहेरून जिल्ह्यात येणाऱ्यांना असणारा १४ दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा नियम शिथिल करण्यात आला आहे. मात्र, जे लोक कोरोना पॉझिटिव्ह आहेत व होम आयसोलेशनमध्ये आहेत, त्यांना १४ दिवस क्वारंटाईन राहवेच लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अभिप्राय द्या..