कुडाळ /-

कुडाळ तालुक्याने आज सोमवारी १००० कोरोनारुग्णांचा टप्पा गाठला असून कुडाळ शहरात एकही रूग्ण आढळून आला नाही,कुडाळ तालुक्यात आज सोमवारी ४ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. यात पाट ३, पडवे १ असे रूग्ण आढळून आले आहेत.तसेच तालुक्यात ३८४ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी ३४४ कंटेन्मेट झोन पूर्ण झाले तर सध्या ४० कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत. तालुक्यात एकुण रुग्ण १ हजार तर बरे झालेले रुग्ण ८३८ आणि सक्रिय रुग्ण १३४ आहेत. आतापर्यंत तालुक्यात २८ रुग्ण दगावले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page