▪️दाखले देताना कायद्यावर बोट ठेवल्याचा आरोपःप्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशारा..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.

कायद्याची चौकट पुढे करुन मराठा समाजाच्या मुलांना दाखले देताना अडवणूक करू नका त्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी त्यांना ई डब्लू एसचे दाखले द्या अन्यथा तुमच्या विरोधात न्यायालयात जनहीत याचिका दाखल करावी लागेल असा इशारा आज येथे सकल मराठा समाजाच्या वतीने अध्यक्ष सीताराम गावडे यांनी सावंतवाडीचे तहसिलदार श्रीधर पाटील यांना दिला.

यावेळी घोषणा देवून तहसिलदारांच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला
दरम्यान कोणाचे नुकसान होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत परंतू त्या ठीकाणी शासनाने घालून दिलेल्या नियमाच्या पलीकडे जावून आम्ही काम करू शकत नाही त्यामुळे तुम्ही दाखल्याचे प्रस्ताव सादर करा आम्ही याबाबत योग्य तो निर्णय घेवू असे श्री पाटील यांनी उपस्थित पदाधिकार्‍यांना सांगितले
मराठा समाजातील मुलांना दाखले मिळण्यासाठी अडचणी येत आहे त्यामुळे याबाबत जाब विचारण्यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने आज येथिल तहसिलदार श्री पाटील यांना घेराव घालण्यात आला यावेळी ज्या मुलांनी मराठा आरक्षणाचा लाभ घेतलेला नाही त्यांना ई डब्लू एस असे दाखले उपलब्ध करुन द्या तसेच त्यांच्याकडून तसेच प्रतिज्ञापत्र करून घ्या म्हणजे भविष्यात कोणालाच अडचणी येणार नाही मात्र दाखल्या अभावी कोणत्याही मुलांचे नुकसान करू नका अशी त्यांनी मागणी केेली
यावेळी आम्ही दाखले देण्यासाठी तत्पर आहोत परंतू त्या ठीकाणी काही त्रुटी असल्यामुळे आमचे हात बांधील आहेत डबल दाखले देतो येणार नाही त्यामुळे आम्ही सर्व बाबी तपासूनच पुढील निर्णय घेणार आहोत असे श्री पाटील यांनी सांगितले
यावेळी तुम्ही मुलांना सहकार्य करीत नसाल तर आम्ही तुमच्या विरोधात न्यायालयात दाद मागू वरिष्टांकडे तक्रारी करू असा इशारा यावेळी देण्यात आला तसेच संतप्त झालेल्या पदाधिकार्‍यांनी कार्यालयाच्या बाहेर येवून तहसिलदार पाटील यांचा निषेध केला तसेच कोण म्हणतो घेणार नाही घेतल्या शिवाय जाणार नाही,मराठा समाज बांधवाच्या एकजूटीचा विजय असो अशा घोषणा दिल्या
यावेळी सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सिताराम गावडे यांनी नाराजी व्यक्त केली तहसिलदारांनी कायद्याचा बाउ न करता मुलांना सहकार्य केले पाहीजे या ठीकाणी आम्ही डबल आरक्षण मागत नाही परंतू एक तरी आरक्षण द्या अशी आम्ही मागणी केली होती परंतू तहसिलदारांनी योग्य ती उत्तरे दिली नाहीत त्यामुळे आता संघर्ष अटळ आहे असे ते म्हणाले
यावेेळी सकल मराठा समाज अध्यक्ष सीताराम गावडे,माजी नगरसेवक विलास जाधव खेमराज कुडतरकर,प्रा सतीश बागवे ,माजी सभापती प्रमोद सावंत,प्रमोद गावडे,तारकेश सावंत,राघोजी सावंत,उमा वारंग,लवू लटम,सचीन सावंत,अजय सावंत,अमीत परब,बंटी माठेकर, महादेव सावंत, राजेश नाईक,राजू तावडे,युक्ता सावंत,दिया सावंत,श्रीराम पवार,काका मांजरेकर, सचिन कृष्णा सावंत, संदिप सावंत,मनोज घाटकर,संजय लाड,सरपंच विजय गावडे, संतोष परब समीर शिंदे,आंकूश गावडे, नारायण राणे,शिवदत्त घोगळे,विनायक गुरव, गुणाजी गावडे,अब्जू सावंत,महादेव राऊळ कैलास परब,गंगाराम घाटकर,विजय पवार,रोहन चव्हाण, प्रशांत मोरजकर सुभाष गावडे, सुधीर राऊळ,राकेश परब,विजय बांदेकर, गंगाराम राऊळ,सुहास कदम,ऋषी सावंत,कोमल,गावडे ,प्रियांका निर्गुण आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page