✍🏼लोकसंवाद /- देवगड.

शिवप्रतिष्ठान फणसे, मुंबई मंडळाच्या वतीने दिनांक १५.०६.२०२४ रोजी गाव – खुडी, तालुका देवगड, जिल्हा सिंधदुर्ग या गावातील सर्व जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप (दप्तर, वह्या,कलर बॉक्स, चित्रकला पुस्तक व कंपास मधील साहित्य) वाटप करण्यात आले. शिव प्रतिष्ठान फणसे, मुंबई मंडळाचे हे ७वे वर्ष असून या कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष श्री. महेश दांडेकर, उपाध्यक्ष – श्री प्रमोद लाळये, सरचिटणीस – श्री. गणेश गावकर, खजिनदार – श्री. तुषार गावकर, सदस्य – श्री संजय कांबळी, श्री विश्वनाथ गावकर, श्री. रुपेश फटक, श्री. रणजित परकर, श्री. दिनेश फणसेकर तसेच जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका -सौ.स्मिता कदम मॅडम,
गावचे सरपंच-श्री.दिपक कदम,
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष-श्री.निलेश कामतेकर,
शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,शिक्षक वृंद ग्रामस्थ, विद्यार्थी व पालक वर्ग,उपस्थित होते.
या प्रसंगी श्री.रूपेश फाटक यांनी शिव प्रतिष्ठान या मंडळाची वाटचाल व शैक्षणिक उपक्रमांबद्दल माहिती दिली व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.सुरज मुणगेकर व जुवीवाडी मित्रमंडळाचे विशेष सहकार्य लाभले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.योगेश पाटील यांनी केले .शिव प्रतिष्ठान-फणसे,मुंबई यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल व दातृत्वाच्या भावनेबद्दल खुडी गावचे सरपंच श्री‌.दिपक कदम यांनी गौरवोद्गार काढले व शिव प्रतिष्ठान मंडळाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत खुडी शाळा तसेच संपुर्ण गावाच्या वतीने आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page