वेंगुर्ला /-
वेंगुर्ला तालुक्यातील वेतोरे वरचीवाडी ग्रामपंचायत ग्रामसेवक भूषण दत्तात्रय चव्हाण यांना नुकताच यावर्षीचा जि.प.चा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त झाला.यानिमित्त ग्रा.प.च्या वतीने त्यांचा शाल ,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच राधिका गावडे,उपसरपंच कोमल नाईक,माजी उपसरपंच तथा ग्रा.प.सदस्य रघुनाथ वालावलकर, सुधीर गावडे,अरुण राऊळ, यशश्री नाईक,स्वप्नाली सावंत,विनया धुरी,सविता जाधव,विष्णू गावडे,ग्रा.प.कर्मचारी महादेव सावंत,आपा परब,वेदा गावडे,सातार्डेकर,दीप्ती धुरी,ग्रामस्थ आदी उपस्थित होते.