वेंगुर्ला /-
मच्छिमार बांधवानी मच्छिमारी सोबत पुरक उद्योगधंदे सुरु करुन पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेचा फायदा घेऊन आत्मनिर्भर बनावे,असे आवाहन जिल्हा संयोजक अतुल काळसेकर यांनी केले.वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा येथील माऊली सभागृहात मीठ उत्पादक शेतकरी व मच्छिमार यांच्यासाठी आत्मनिर्भर अभियान अंतर्गत चर्चासत्राचे आयोजित करण्यात आले होते.आत्मनिर्भर अभियान जिल्हा संयोजक अतुल काळसेकर,भगीरथ प्रतिष्ठानचे डाॅ. प्रसाद देवधर ,जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई,जिल्हा बॅंकेचे संचालक राजन गावडे , साईप्रसाद नाईक,शिरोडा सरपंच मनोज उगवेकर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी मीठ उत्पादक शेतकरी यांची प्रोडुसर कंपनीची स्थापना करण्याबाबत डाॅ. प्रसाद देवधर यांनी मार्गदर्शन केले .तसेच शिरोडा मीठाचा भविष्यात ब्रँड बनवुन महात्मा गांधी यांनी शिरोड्यात केलेल्या सत्याग्रहाची आठवण म्हणून एक वेगळ्या प्रकारचे स्मारक बनवुया असे आवाहन केले.यावेळी शिरोडा गावातील मीठ उत्पादक शेतकरी व मच्छिमार उपस्थित होते .