कुडाळ /-
उमेद अभियान हे सर्व स्तरातील महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रशिक्षित मार्गदर्शकांच्या माध्ढयमातून प्रशिक्षण देऊन महिलांना उद्दोजिका बनविणे यासाठीच सुरू करण्यात आले आहे. यासाठी शासनाने प्रशिक्षकांची नेमणूक कंत्राटी पद्धतीने केली, या प्रशिक्षकांच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शना नुसार बचत गटातील महिलांचं मिळत असलेल्या पैशाचं योग्य नियोजन आणि छोटे छोटे उद्योग सुरु करण्याचं काम उत्तम रितीने सुरु असतानाच या *उमेद अभियाना* तील महत्वाचा दुवा असलेल्या महाराष्ट्रातील ३ते४ हजार कर्मचारी वर्गाची फेरनियुक्ती थांबबण्यात आली आहे. ज्यामुळे महिलांचं आर्थिक व औद्योगिक मोठं नुकसान होणारं असून मानसिक खच्चीकरण होणार आहे.
भाजपा महिला मोर्चाने यापूर्वीच या सर्व कर्मचारी वर्गाला
त्वरीत पुनर्नियुक्ती देण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्याच प्रमाणे उमेद बचत गटातील सर्व महिलांच्या पाठीशी भाजपा महिला मोर्चा खंबीर पणे उभा रहाणार आहे.
त्याचप्रमाणे नुकतेच सिंधुदुर्ग दौर्यावर आलेले भाजपा चे राष्ट्रीय चिटणीस माजी मंत्री सन्माननीय श्री विनोदजी तावडेसाहेब यांनी सुद्धा महाराष्ट्रातील सर्व उमेद कर्मचार्यांच्या पाठीशी भाजपा खंबीर पणे उभा रहाणार असल्याचे सांगितले
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उमेद प्रतिनिधी यांनी माननीय आमदार नितेश राणे यांनाही आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत निवेदन दिले. माननीय आमदार नितेशजींनी याबाबत ग्रामविकास मंत्री यांच्याशी याबाबत चर्चा करणार असल्याचे सांगितले तसेच होत असल्याचे अन्यायाचा जाब सरकार ला विचारल्याशिवाय रहाणार नसून भाजपा आपल्या पाठीशी असल्याचे सांगितले.
त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील उमेद च्या कर्मचारी आणि आमच्या महिला भगिनींना एवढच सागणं आहे , भारतीय जनता पार्टी आपल्या लढ्यात खंबीरपणे पाठीशी उभी आहे आणि तुम्हाला न्याय मिळवूनच देईल.
याच पार्श्वभूमीवर आपली *उमेद* वाचविण्यासाठी येत्या १२ आक्टोबर ला महिला भगिनी आपल्या विकासासाठी देत असलेल्या लढ्याला भाजपा महिला मोर्चा जाहिर पाठिंबा देत आहे जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील आमच्या विकासाच्या वाटेवर खंबीरपणे पाऊल टाकत असलेल्या भगिनींना न्याय मिळालाच पाहिजे.
सौ. संध्या प्रसाद तेरसे
अध्यक्ष
भाजपा महिला मोर्चा, सिंधुदुर्ग