कुडाळ /-

मुंबई येथील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल ॲण्ड मेडीकल रिसर्च इन्स्टीटयूट मुंबई यांच्यातर्फे बॅ.नाथ पै नर्सिंग ‍कॉलेज कुडाळ येथे घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्हूमध्ये कुडाळ येथील बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेजच्या ४४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

या कॅम्पस इंटरव्ह्यूचे उदघाटन कोकीलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल ॲण्ड मेडीकल रिसर्च इन्स्टीटयूट मुंबई यांच्या पथकातील हावोवी फौजदार, गुणवत्ता आणि प्रशिक्षण नर्स शिक्षिका स्नेहा करमळकर,
एचआर विभाग वरिष्ठ अधिकारी प्रज्ञा देवळेकर यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर, नर्सिंग कॉलेजच्या उपप्राचार्या कल्पना भंडारी, नर्सिंग कॉलेजचे प्रा. ज्योती साकीन-तारी, प्रा.प्रणाली मयेकर, प्रा. सुमन करंगळे- सावंत, प्रा. शांभवी आजगावकर, प्रा. सौरभ खेडेकर, प्रा. अंकीता झगडे, प्रा. ऐश्वर्या सावंत उपस्थित होते.

बॅ. नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग संचलित बॅ. नाथ पै कॉलेज ऑफ नर्सिंग कुडाळ महाविद्यालयामध्ये अंतीम वर्ष बेसिक बी. एस्सी नर्सिंग व तृतीय वर्ष जीएनएम या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी बॅ. नाथ पै प्लेसमेंट सेल अंतर्गत कँम्पस इंटरव्हूचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना करिअरच्या घडणीमध्ये विविध रोजगारसंधीचा लाभ मिळावा, या उददेशाने बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे मानद संचालक डॉ. अमेय देसाई, डॉ. इशा पाटील व बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या मीना जोशी यांच्या सहकार्यातून व कॅम्पस प्लेसमेंट सेल च्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पस इंटरव्हूमध्ये ४४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे उमेश गाळवणकर, मीना जोशी व कल्पना भंडारी यांनी अभिनंदन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page