मुंबई /-
▪️देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येनं 68 लाखांचा टप्पा पार केला आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये 78,524 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर चोवीस तासांमध्ये 971 जणांच्या मृत्यूचीही नोंद झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
▪️ *उपचार* : देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 68 लाख 35 हजार 656 इतकी झाली आहे. तर सध्या 9 लाख 2 हजार 425 जणांवर उपचार सुरू आहेत.
▪️ *कोरोनावर मात* : आतापर्यंत 58 लाख 27 हजार 705 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत देशात 1 लाख 5 हजार 526 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागनं दिली आहे.
▪️ *कोरोना चाचणी* दरम्यान, देशात 7 ऑक्टोबर पर्यंत एकूण 8 कोटी 34 लाख 65 हजार 975 जणांची कोरोना चाचणी करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली.