रुग्ण संख्येत लक्षणीय घट..
रत्नागिरी /-
●माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत 80 टक्क्यांपेक्षा अधिक नागरिकांची तपासणी पूर्ण होत आली असून याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. दररोज येणाऱ्या पॉझिटिव्ह च्या संख्येत लक्षणीय घट आता झाली आहे. आरटीपीसीआर आणि ॲन्टीजेन अशा 49 हजार 323 जणांची चाचणी आतापर्यंत झाली.
▪️पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण घटले असून आता मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्याचे उद्दीष्ट आहे.
▪️प्रयोगशाळा व खाजगी रुग्णालये यात 49 हजार 323 चाचण्या झाल्या . यात आतापर्यंत 7873 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत तर 41 हजार 438 रुग्ण निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 6950 रुग्णांनी कोरोनावर मात केल आहे. हे आरोग्य यंत्रणा व प्रशासनाचे यश आहे.
▪️नागरिकांच्या सहकार्यातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण झपाटयाने वाढत असून आतापर्यंत 88.27 टक्के रुग्ण बरे झाले आहेत.
▪️नागरिकांनी मास्कचा वापर, सॅनिटायझर व स्वच्छता आणि जबाबदारीपूर्वक सुरक्षित अंतर राखले तर येणाऱ्या काही दिवसात अतिशय चांगले परिणाम दिसणार आहेत.