आज जिल्ह्यात सापडले ५८ तर,कुडाळ तालुक्यात आज बुधवारी एवढे कोरोना बाधित रुग्ण सापडले..

आज जिल्ह्यात सापडले ५८ तर,कुडाळ तालुक्यात आज बुधवारी एवढे कोरोना बाधित रुग्ण सापडले..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज बुधवारी कोरोना रुग्ण आढळून आले असून त्यात तब्बल २४ कोरोना रुग्ण सापडले आहेत. कुडाळ शहरात ८ रुग्ण आढळले आहेत. तर तालुक्यात ९५९ रुग्ण आहेत. कुडाळ तालुक्यात आज बुधवारी २४ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. कुडाळ ८, गुढीपूर १, कसाल १, ओरोस ५, आंब्रड २, वाडोस १, पांग्रड १, नेरुर कर्यात नारुर १, वर्दे १, अणाव हुमरमळा १, तेर्सेबांबर्डे १, पोखरण १ असे रुग्ण आढळले.तसेच तालुक्यात ३६२ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी ३२३ कंटेन्मेट झोन पूर्ण झाले तर सध्या ३९ कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत. तालुक्यात एकुण रुग्ण ९५९ तर बरे झालेले रुग्ण ७५२ आणि सक्रिय रुग्ण १८१ आहेत. आतापर्यंत तालुक्यात ३९ रुग्ण दगावले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली.

अभिप्राय द्या..