नगराध्यक्ष संजू परब यांची घेतली जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांची भेट..

नगराध्यक्ष संजू परब यांची घेतली जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांची भेट..

सावंतवाडी /-

सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी आज जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांची भेट घेतली आहे. यावेळी संजू परब यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरात उपजिल्हा रुग्णालयात कोव्हिडसाठी १० बेडच हॉस्पिटल योग्य त्या सुविधा देत सुरू करावे अशी मागणी केली आहे. तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी ही योजना शहरात १०० टक्के यशस्वी पणे राबवली असून नगरपरिषद कर्मचाऱ्यांना कोव्हिड काळात काम केल्याबद्दल मानधन मिळावे अशी मागणी केली आहे. तसेच शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून त्यासाठी निधी मिळावा तसेच विविध कामांसाठी निधी प्राप्त व्हावा अशी मागणी केली आहे. यावेळी मुख्याधिकारी संतोष जिरंगे, नगरसेवक आनंद नेवगी, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..