आयपीएल सट्टा प्रकरणी रायगड पोलिसांकडून ११ जणांना अटक..

आयपीएल सट्टा प्रकरणी रायगड पोलिसांकडून ११ जणांना अटक..

मुंबई /-

कर्जत: आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या ११ जणांना रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत अटक केली आहे. आयपीएल क्रिकेटवर दरम्यान ऑनलाईन सट्टा आणि बेटिंग लावत असलेल्या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या कारवाईत पोलिसांनी बुकी आणि मध्यस्थी यांना देखील अटक केली आहे. १६ मोबाईलसह कॅलक्यूलेटर जप्त करण्यात आले आहे.या प्रकरणातील आणखी ५ आरोपी फरार आहेत. अन्य आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाले आहेत. कर्जतच्या एका हॉटेलमधून हा सर्व सट्टा चालत होता. रायगड पोलिसांनी धडक कारवाई करत आरोपींना अटक करण्यात यश आलं आहे.

अभिप्राय द्या..