चिपळूण /-
चिपळूण संगमेश्वर चे आमदार शेखर निकम यांची पंचायत राज समिती विधीमंडळाच्या सदस्यपदी निवड झाल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.
चिपळूण संगमेश्वर मधून आमदार म्हणून निवडून आल्यावर आमदार शेखर निकम यांनी मतदार संघातील अनेक विषय अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडले आहेत. तसेच एक सुशिक्षित आणि संयमी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे नेहमीच पाहिले जाते. विधिमंडळाच्या अधिवेशनात त्यांनी केलेले भाषण आणि अभ्यासपूर्ण विषयांची मांडणी हे पाहून त्यांना विधिमंडळाच्या या महत्वाच्या पंचायत राज समिती सदस्यपदी नेमणूक करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचे सर्व मतदारसंघातून अभिनंदन करण्यात येत आहे.