१७ ऑक्टोबरपासून धावणार तेजस एक्स्प्रेस…

१७ ऑक्टोबरपासून धावणार तेजस एक्स्प्रेस…

मुंबई /-

देशातील पहिली खासगी ट्रेन तेजस दसरा आणि दिवाळीपूर्वी पुन्हा रुळावर धावणार असून याबाबतची माहिती आयआरसीटीसीने (इंडियन रेलवे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) दिली आहे. तेजस एक्स्प्रेसच्या नावाने दिल्ली- लखनऊ, अहमदाबाद- मुंबई आणि वाराणसी-इंदूर दरम्यान खासगी ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत.

*पुन्हा सुरु* : कोरोनामुळे 22 मार्चपासून या ट्रेन रुळावरच उभ्या आहेत. मात्र आता आयआरसीटीसीमार्फत चालवण्यात येणाऱ्या ट्रेन 17 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरु होणार आहेत.

दरम्यान 8 ऑक्टोबरपासून तेजस एक्स्प्रेसचे तिकीट बुकिंग सुरु होणार असून या ट्रेनच्या सीटचे बुकिंग आयआरसीटीसी कडून सुरू करण्यात येणार आहे.

प्रवासादरम्यान प्रवाशांना ट्रेनमध्ये पॅक करुन जेवण मिळणार आहे. आयआरसीटीसी आणि रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांमध्ये मंगळवारी झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.

अभिप्राय द्या..