रिक्षाची वयोमर्यादा पुर्ववत ठेवावी.; समविचारीची मागणी..

रिक्षाची वयोमर्यादा पुर्ववत ठेवावी.; समविचारीची मागणी..

रत्नागिरी /-

रिक्षाच्या निवृत्तीचे वय २० वरून १५ वर्षांपर्यंत खाली आणण्याचा शासनाचा निर्णय हा खर्चीक असून श्रमिक वर्गावर अन्याय करणारा आहे.म्हणून शासनाने रिक्षाची वयोमर्यादा पुर्वीप्रमाणेच ठेवावी अशी मागणी महाराष्ट्र समविचारी मंचचे राज्य सरचिटणीस संजय पुनसकर यांनी केली आहे.

सर्वसामान्यांचा रिक्षा प्रवास सुरक्षित व्हावा म्हणून राज्य परिवहन प्राधिकरणाने रिक्षाच्या निवृत्तीचे वय २० वरून १५ वर्षांपर्यंत खाली आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात (एमएमआर) १ ऑगस्ट २०२१ पासून होणार आहे. त्यामुळे १५ वर्षांवरील रिक्षा भंगारात काढाव्या लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निर्णयाने सुव्यवस्थित जपलेल्या रिक्षा व्यवसायिकांना आर्थिक भुर्दड सोसावा लागणार आहे.कर्जे घेऊन कुटुंब चरितार्थ चालविणा-या रिक्षा व्यवसायिकांवर हा अन्याय होईल असे पुनसकर यांनी म्हटले आहे.याबाबत समविचारी मंच आवश्यक त्या ठिकाणी आपला विरोध दर्शवेल असेही जाहीर करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..