भाजपा च्या सेवा पुस्तिकेचे प्रकाशन

भाजपा च्या सेवा पुस्तिकेचे प्रकाशन

वेंगुर्ला /-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेश भाजपाच्या वतीने दिनांक १४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर या कालावधीत संघटन ही सेवा या सेवा सप्ताहाचे आयोजन केले होते.या सेवा सप्ताह सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक म्हणून जबाबदारी प्रसन्ना ऊर्फ बाळु देसाई यांचेकडे दिली होती.
जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली १४ ही मंडलात सेवा सप्ताहाच्या माध्यमातून सेवाभावी उपक्रम आयोजित केले.या सेवा सप्ताहामध्ये रक्तदान शिबिर ,वृक्षवाटप, वृक्षारोपण,स्वच्छता मोहीम ,प्लास्टिक मुक्ती अभियान ,सागर किनारा स्वच्छता अभियान, रुग्णांना फळे वाटप,कोविड सेंटरला वेपोरायझर कीट भेट, सार्वजनिक ठिकाणी निर्जंतुकीकरण फवारणी, कोविड योद्ध्यांचा सन्मान इत्यादी सेवाकार्य करुन सेवा सप्ताह सिंधुदुर्ग जिल्हात साजरा करण्यात आला.या संपूर्ण कालावधीत केलेले उपक्रम पुस्तकरूपाने संकलीत करुन त्याची सेवा पुस्तिका तयार करून त्या पुस्तिकेचे प्रकाशन ओरोस – सिंधुदुर्गनगरी येथे वसंत स्म्रुती सभागृहात जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक , महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सेवा सप्ताह जिल्हा संयोजक प्रसन्ना देसाई,संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत,जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई , जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, जेष्ठ नेते राजु राऊळ, उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर, मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर, वेंगुर्ले भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, कुडाळ तालुकाध्यक्ष विनायक राणे ,कसाल मंडल अध्यक्ष गोपाळ हरमलकर, किसान मोर्चा चे उमेश सावंत तसेच जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..