वेंगुर्ला शिवसेनेच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन

वेंगुर्ला /-

कोरोनामुळे गेल्या ६ ते ७ महिन्यापासून सर्व जगावर मंदीचे सावट आले आहे.लॉकडाऊन व त्यांनतरच्या कालावधीमध्ये तालुक्यातील उद्योगधंद्यावरही परिणाम झाला आहे.याबाबत वेंगुर्ले नगरपरिषदेच्या मालकीच्या गाळेधारकांना भाडे माफ करण्याबाबत तसा प्रस्ताव न.प.कौन्सिल मध्ये ठेवण्यात यावा,अशी मागणी वेंगुर्ले शिवसेनेच्या वतीने मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,कोरोना महामारीमुळे सर्वत्र मंदीचे सावट आहे.वेंगुर्ला तालुक्यातील नगरपरिषदेच्या मालकीच्या गाळ्यामध्ये असलेले सर्व छोटे मोठे गाळेधारक यांच्या उद्योगधंद्यावर फार मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे.परंतु त्याचे लाईट बिल व इतर खर्च मात्र सुरूच आहे. त्यांचा भाड्यामध्ये गेल्या ५ ते ६ महिन्याचा कालावधीमध्ये भाडे माफ केल्यास त्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल. याबाबत गांभीर्याने विचार करून सदर विषय न.प.कौन्सिल मध्ये ठेवून भाडे माफ किंवा थोड्या प्रमाणात कमी करण्याबाबत विचार व्हावा, अशी मागणी वेंगुर्ला शिवसेना वतीने शहरप्रमुख अजित राऊळ यांनी केली आहे.यावेळी जिल्हा कार्यकरिणी सदस्य सचिन वालावलकर,महिला शहर संघटक मंजुषा आरोलकर आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page