वेंगुर्ला शहरात पाच ठिकाणी वॉटर एटीएम सुविधा मशिनचा शुभारंभ वेंगुर्ला-

वेंगुर्ला शहरात पाच ठिकाणी वॉटर एटीएम सुविधा मशिनचा शुभारंभ वेंगुर्ला-

वेंगुर्ला /-

वेंगुर्ले नगरपरिषदेतर्फे नाविण्यपुर्ण योजनेतून शहरात पाच ठिकाणी वॉटर एटीएम मशिनचा शुभारंभ करण्यात आला.

या वॉटर एटीएम सुविधेचा शुभारंभ आज वेंगुर्ले न.प. नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी उप नगराध्यक्षा अस्मिता राऊळ, नगरसेवक सुहास गवंडळकर, विधाता सावंत, प्रशांत आपटे, प्रकाश डिचोलकर, धर्मराज कांबळी, कृतिका कुबल, स्नेहल खोबरेकर, अधिक्षक संगिता कुबल, पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

वेंगुर्लेत येणाऱ्या पर्यटक, शहरातील नागरिकांना तसेच ग्रामिण भागातून येणाऱ्या नागारिकांना पिण्याचे पाणी विनासायास उपलब्ध व्हावे, यासाठी वेंगुर्ले नगरपरिषदेने नाविण्यपुर्ण योजनेतून शहरात पाच ठिकाणी वॉटर एटीएम मशिन बसविली आहेत. वॉटर एटीएम सुविधा उपलब्ध करुन देणारी वेंगुर्ले न. प. हि सिंधुदुर्गातील पहिलीच न. प. आहे. वेंगुर्ले नगरपरिषदेने कौन्सिल सभेत वेंगुर्ले बंदर, दाभोली नाका, रामेश्वर मंदिर, हॉस्पिटल नाका व वेंगुर्ले न. प. इमारत अशा पाच ठिकाणी वॉटर एटीएम मशिन सुविधा उभारण्या संदर्भात ठराव करुन सदरचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविला होता. सदर मंजूर झालेल्या निधीतून शहरात पाच ठिकाणी हि वॉटर एटीएम मशिन बसविण्यात आली आहेत.

अभिप्राय द्या..