दोन दिवसांपूर्वी त्या खाणीत पडून झाला होता दोन चिमुखल्यांचा मृत्यू

दोडामार्ग /-

वझरे कोळगिरा येथे परवाना संपलेल्या खाणी उघड्या असून त्यात पडून दोन दिवसांपूर्वी पडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. यामुळे दोडामार्ग तालुक्यात खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून याची दखल घेत या पीडित कुटुंबाला शासकीय मदत मिळावी तसेच या खांणमालकवर कारवाई व्हावी यासाठी तहसीलदार दोडामार्ग यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी अल्पसंख्य जिल्हा आध्यश नझिर शेख, दोडामार्ग तालुकाध्यक्ष बाबी बोर्डेकर, व्हीजेएनटी सेलचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष संदेश वरक शहराध्यक्ष सुदेश तुळसकर यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page