वेंगुर्ला /-

वेंगुर्ले तालुक्यातील केळूस पोस्ट कार्यालयास सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना संपर्कप्रमुख विक्रांत सावंत यांच्या माध्यमातून सँनिटायझर मशिन आणि तळवडे गोठावडेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते यशवंत केरकर यांनी सँनिटायझर बाँटल भेट देण्यात आली आहे.

पोस्ट कार्यालयात प्रवेश करताना हाताचा स्पर्श न करता सँनिटायझरचा वापर करता येईल अशी अत्याधुनिक मशिन या कार्यालयांस भेट देण्यात आली.पँडलचा वापर करून सँनिटायझरचा उपयोग करता येणारी हि मशिन असून कार्यालयात येणाऱ्या कर्मचारी व नागरिकांना आरोग्य सुरक्षिततेच्या दृष्टीने हि मशिन उपयुक्त ठरणारी आहे.

केळुस गावचे उपसरपंच व पत्रकार श्री आबा खवणेकर यांच्या विनंतीवरून आणि पाठपुराव्यामुळे हि मशिन केळूस पोस्ट कार्यालयास विक्रांत सावंत यांनी दिली.तर यशवंत उर्फ काकल केरकर यांनी सॅनिटाईजर बाॅटल दिली.

यावेळी पोस्ट मास्तर श्रीम विद्या राऊळ यांनी विक्रांत सावंत,यशवंत केरकर यांचे आभार मानत येथिल उपसरपंच आबा खवणेकर यांनी या गोष्टिसाठी वारंवार पाठपुरावा केला त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले तसेच आपल्या कार्यकालात पोस्ट ऑफिसला वस्तू विनामूल्य भेट देण्याची हि पहिलीच वेळ असल्याचे सांगितले.

यावेळी उपसरपंच आबा खवणेकर,माजी ग्रामपंचायत सदस्य गोपाळ केळुसकर, पोस्टमन लक्ष्मण केळुसकर,शेखर राऊळ, रिक्षाचालक सचिन मुणनकर, उमेश मुणनकर,गोपाळ वेंगुर्लेकर,प्रदिप केळुसकर,महेश राजंणकर,अनिल पिंगळे,गणेश उर्फ दादा मुणनकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page