कुडाळ /-
मार्च पासून लाॅकडाऊनची कोंडी सुटता सुटेना तसेच शेतकरी,कष्टकरी मजूर यांचे दैनंदिन जीवनमान अद्याप स्थिरस्थावर झालेले नाही.त्यामुळे येथील सर्वसामान्य शेतकरी.मजुरदार. महाभयंकर आर्थिक संकटात सापडलेला असतानाही उदार.उसनवारी करून शेतात राबून पोटाची खळगी भरण्यासाठी मेहनत घेतली. आणि हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला गेला. सतत कोसळणाऱ्या अवकाळी पावसाने कापणीस आलेली भातशेती कुजून जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तात्काळ वस्तुस्थितीजन्य परिस्थितीची पहाणी करून नुकसान झालेल्या भातशेतीचे पंचयादी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल विभागाला ध्यावेत तसेच तुटपुंजी मदत देऊन सोपस्कार पूर्ण न करता प्रती हेक्टरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी.अशी मागणी सिंधूदूर्ग जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री. प्रफुल्ल सुद्रिक यांनी केली असुन याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री.अजितदादा पवार. प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे लक्ष वेधले असून तातडीने पहाणी करून पंचयाद्या करण्याच्या सूचना महसूल विभागाला करण्याची मागणी केली असल्याचे युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक यांनी सांगितले.