पुणे /-

लग्न झाल्यानंतर प्रत्येकाच्या वैवाहिक जीवनात ‘हनिमून ‘ हा विषय येतोच ,यात पुण्यातील एकाने
‘हनिमूनला गोव्यात गेल्यानंतर पतीने पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार केला आहे. पुण्यात परत आल्यानंतर एका भोंदूबाबाला घरी बोलवले व त्याच्या सांगण्यावरून विवाहितेला ‘तुझ्यात दोष’ असे म्हणत तिचा मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.तर तिला मुद्दाम वेगवेगळ्या तीन मोठ्या रुग्णालयात अनेक टेस्ट’ करण्यास सांगत तिच्याकडे 5 लाखांची मागणी केली आहे.

याप्रकरणी 23 वर्षीय विवाहितेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 28 वर्षीय पती त्याचे आई-वडील, मोठ्या व लहान भावावर IPC कलम 498, 377 सह इतर कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गृहिणी आहेत. तर पती खासगी कंपनीत नोकरी करतो. दरम्यान त्यांचा मे 2019 मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर ते गोव्याला हनिमूनला गेले होते. पण तेथे गेल्यावर विवाहितेला मासिक पाळी आली. पण त्यानंतर देखील आरोपी पतीने जबरदस्ती करत अनैसर्गिक अत्याचार केले. यानंतर ते काही दिवसांनी परत आले. मात्र विवाहीता आजारी पडली. यावेळी पतीच्या कुटुंबियांनी एक भोंदूबा घरी बोलावला. त्याला घरात फिरून काही दोष आहे का, हे पाहण्यास 6. सांगितले.यानंतर तो भोंदूबाबा घरात फिरला.यावेळी त्याने घरात दोष नसून तुमच्या सुनेत दोष असल्याचे सांगितले.यानंतर त्याने फिर्यादी यांना बसवून त्यांच्या हातात एक लिंबू दिले व तो काही तरी बदबदला.यानंतर तो भोंदूबाबा निघून गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page