वेंगुर्ला तालुक्यात कोरोनामुळे येवढ्या व्यक्तींचा मृत्यू.;तर २८८ व्यक्ती कोरोनामुक्त

वेंगुर्ला तालुक्यात कोरोनामुळे येवढ्या व्यक्तींचा मृत्यू.;तर २८८ व्यक्ती कोरोनामुक्त

वेंगुर्ला/-

वेंगुर्ला तालुक्यात आज सोमवारी कुर्लेवाडी येथील १ व्यक्तीचा(पॉझिटिव्ह संपर्कातील)कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
आसोली रांजणवाडी येथील ७० वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे,अशी माहिती तालुका मेडिकल ऑफिसर डॉ. अश्विनी सामंत यांनी दिली आहे.
संबंधित व्यक्तीला १ ऑक्टोबरला ओरोस येथे ऍडमिट केले होते.त्यांचा स्वाब रिपोर्ट ३ ऑक्टोबरला पॉझिटिव्ह आला होता.त्याच दिवशी रात्री त्यांचे ओरोस येथे निधन झाले.दरम्यान तालुक्यात आतापर्यंत एकूण ३५७ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या असून २८८ व्यक्ती बऱ्या झाल्या आहेत.एकूण ९ मृत्यू झाले असून ६० व्यक्ती उपचाराखाली आहेत.

अभिप्राय द्या..