वेंगुर्ला /-

– भाजपा चे निष्ठावान कार्यकर्ते व वायंगणी शक्ती केंद्र प्रमुख कमलाकांत प्रभु यांचे आकस्मीक निधन झाले . त्यांना भाजपा वेंगुर्ले च्या वतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन वेतोरे येथील गोगटे मंगल कार्यालयात करण्यात आले .
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आत्माराम बागलकर यांनी संघाच्या सुरुवातीच्या काळात कमलाकांत प्रभु यांचे योगदान त्याचप्रमाणे त्यांचा तळागाळापर्यंत असलेला संपर्क याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या .
सर्वच वक्त्यांनी कमलाकांत प्रभु यांच्या जाण्याचे पक्षाचे फार मोठे नुकसान झाले असल्याची भावना व्यक्त केली .
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक , महिला ता. अध्यक्षा स्मिता दामले , ता सरचिटणीस प्रशांत खानोलकर व बाबली वायंगणकर , सोमनाथ टोमके , ता.उपाध्यक्ष दिपक नाईक , वेतोरे सरपंच राधिका गावडे , जेष्ठ नेते बाळा सावंत , माजी जि. प.सदस्य बाबा राऊत , वेतोरे सोसा चेअरमन विजय नाईक , शैलेश जामदार , बाळु प्रभु , वेतोरे उपसरपंच कोमल नाईक , ग्रा. प.सदस्या यशश्री नाईक , ज्ञानेश्वर केळजी , सुनील घाग , संघाचे राजन वेतोरकर , बुथप्रमुख आनंद गावडे , मकरंद प्रभु , कुंडेकर इत्यादी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page