▪️नगरसेवक अभिषेक गावडे यांनी लेखी मागणी करत केला होता पाठपुरावा..

✍🏼लोकसंवाद /- समील जळवी,कुडाळ

माजी खासदार डॉ.निलेश राणेंचा विभाग नियंत्रक यांना १ फोन आणि कुडाळ ते डॉनबॉक्सो स्कूल ओरोस सिंधुदुर्गनगरी पर्यंत एस.टी.बस सेवा अखेर सुरू करण्यात आली आहे.ही बस सेवा गुरुवार आज दिनांक ७.११.२०२३ पासून नियमित शाळेच्या वेळेत सुरू करण्यात आली आहे.यासाठी नगरसेवक अभिषेक गावडे यांनी लेखी मागणी करत पाठपुरावा केला होता.या एस.टी.बस चे आज गुरुवारी ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.४५ वाजत कुडाळ चे माजी नगराध्यक्ष श्री.विनायक राणे यांनी नारळ वाढऊन त्यानंतर बस फेरी सुरू करण्यात आली.यावेळी नगरसेवक अभिषेक गावडे उपस्थित होते कुडाळ शहरातील मुलांचे पालक उपस्थित होते..

ही बस सेवा सुरू करण्यासाठी कुडाळ नगरपंचायत चे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक अभिषेक गावडे यांनी विभाग नियंत्रक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, कणकवली यांच्याकडे दिनांक १.११.२०२३ लेखी पत्र देऊन चर्चा करून मागणी केली होती.या पत्रात त्यांनी असे सांगितले होते की,सद्याची बस ची स्थिती पाहता लहान मुलांना या बस मध्दे १०० च्या वर मुलांची संख्या असल्याने काही मुलांना उभ्याने प्रवास करावा लागत आहे.याचा मुलांना त्रास होत आहे.तरी तात्काळ दुसरी बस चालू करून द्यावी अशी मागणी नगरसेवक श्री.अभिषेक गावडे यांनी १ महिन्या पूर्वी केली होती.हीच बाब भाजपचे नगरसेवक अभिषेक गावडे यांनी माजी खासदार डॉ.निलेश राणे यांच्या कानावर घातली त्यांनतर डॉ.निलेश राणे यांनी गावडे यांची लक्षात घेत,विभाग नियंत्रक यांना ऐक फोन केला आणि त्या नंतर झालेल्या चर्चेनंतर अखेर कुडाळ ते डॉनबॉक्सो स्कूल ओरोस पर्यंत एस.टी.बस सेवा आजपासून गुरुवार दिनांक ७.११.२०२३ पासून सुरू करण्यात आली आहे.नगरसेवक अभिषेक गावडे यांनी आणि पालकांनी माजी खासदार डॉ. निलेश राणे यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page