✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग.

दोडामार्ग तालुक्यातील तिलारी येथे पुन्हा हत्ती संकट निर्माण झाले आहे.हत्ती शेती बागायतीचे अतोनात नुकसान करत असून नागरिकांत आणि शेतकरी यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मागील काही महिन्यांपासून थांगपत्ता नसलेले हत्ती पुन्हा एकदा तिलारी खोऱ्यातील हेवाळे, घाटिवडे, बांबर्डे या परिसरात दाखल होत शेतकऱ्यांसह नागरिकांत हत्तीची दहशत निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.

दोन दिवसापूर्वी हेवाळे, घाटिवडे, बांबर्डे येथे एक टस्कर दाखल झाला आहे. या टस्कर हत्तीकडून येथील अनेक शेतकऱ्यांच्या केळी, नारळ बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले आहे. या हत्तीला येथून हाकलून लावण्यासाठी ग्रामस्थांनी अनेक प्रयत्न केले. मात्र, हा टस्कर हत्ती या परिसरातून हललेला नाही. रोज रात्री या ठिकाणी हत्ती दाखल होत येथील शेती तिलारी खोऱ्यातील हेवाळे, घाटिवडे, बांबर्डे या परिसरात आहे. सध्या या भागातील भातकापणी पूर्ण झाली असून कापणी केलेल्या भाताची उडवी शेतात ठेवली आहेत. याठिकाणी हत्ती दाखल झाले तर मेहनतीने पिकवलेल्या पीक हाती येण्याआधीच नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.हत्ती दाखल होण्याचा हाच हंगाम सुरुवातीला हत्ती दाखल झाल्यापासून आजपर्यंतचा अभ्यास केला असता हत्ती दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी तर डिसेंबरमध्ये तिलारी खोऱ्यात दाखल होतात. यावर्षी एक टस्कर सुरुवातीला दाखल झाला असून तो सध्या हेवाळे, घाटिवडे, बांबर्डे आदी भागात धुडगूस घालत आहे. यापुढे

आणखीन हत्तींचा कळप दाखल होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे वनविभागाने तात्काळ उपाययोजना हाती घेण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page