देवगड पोंभूर्ले फणसगांवविभागातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांच्यावतीने “कोरोना रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर्स, नर्स, तंत्रज्ञ व आरोग्य कर्मचारी” यांना पी.पी.ई. किट व एन-९५ मास्क, शिल्डचे वाटप करण्यात आले. देवगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (कोविड-19) कोरोना बाधित रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर्स, नर्स, तंत्रज्ञ व आरोग्य कर्मचारी यांच्याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र, इळये येथे डॉ संतोष कोंडके , तालुका वैद्यकीय अधिकारी यांना जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते ३०० आणि सिव्हील रुग्णालय, ओरस, येथे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते 500 तर खासगी डॉक्टर्स यांना 200 पी.पी.ई. किट+N-95 मास्क+शिल्ड वाटप करण्यात आलेले आहे. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, उप जिल्हाप्रमुख विलास साळसकर, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर, तालुकाप्रमुख मिलिंद साटम, देवगड तालुका युवा अधिकारी अमेय जठार, विभागप्रमुख दिनेश नारकर, युवा विभाग अधिकारी प्रवीण (सोन्या) पाष्टे, विष्णु घाडी, विभागप्रमुख बापर्डे, पडेल विभागप्रमुख रमा राणे, पुरळ विभागप्रमुख संदीप डोळस, , उप विभागप्रमुख, व सरपंच पोंभूर्ले साद्धिक डोंगरकर, जयेश नर, सरपंच उंडील, संदेश सावंत – पटेल, शिवाजी बारवकर – देसाई, नाना गोडे, सुशील (बंड्या) नारकर उपस्थित होते.