देवगड /-

देशभरात हाथरज बलात्कार घटनेने हाहाकार माजविला असतांनाच आज सिंधुदुर्ग जिल्हासुद्धा बलात्काराच्या घटनेने हादरला.देवगड तालुक्यातील विजयदुर्ग विभागातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर तिच्याच चुलत भावाने बलात्कार केला.कधी आडवळणावर तर कधी एकटी गाठून मुलीला जंगलात नेऊन अत्याचार केला आहे. फेब्रुवारी महिन्यापासून हा प्रकार सुरू असून मुगली आठ महिन्याची गरोदर झाल्यानंतर ही घटना उघट झाली.त्यानंतर पीडितेने आज दुपारी कणकवली पोलीस ठाण्यात या बाबतची आपली फिर्याद दाखल केली आहे.

विजयदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका गावातील ही अल्पवयीन मुलगी आपल्या वडिलांना जेवणाचा डबा घेऊन कामाच्या ठिकाणी जात असतांना वाटेत अडवून तिच्याच चुलत भावाने हा बलात्कार केला.पहिल्यांदा जबरदस्तीकेली तेव्हा मुलगी घाबलेली होती तिने कोणालाच काही सांगितले नाही.त्यानंतर धमकी देऊन, आणि आडवळणी वाट अडवून जंगलभागात पुन्हा काही दिवस हा बलात्काराचा प्रकार सुरूच होता. त्यामुळे मुलगी गरोदर राहिली.ही घटना जेव्हा घरात कळली तेव्हा दबावाखाली कुटूंबाला काहीच तक्रार करता आली नाही.आज कणकवलीतील एक डॉक्टर कडे मुलीला आणले असता ही घटना उघड झाली.त्यानंतर एडिशनल एसपी तुषार पाटील, डीवायएसपी शिवाजीराव मुळीक,कणकवली पोलीस निरीक्षक शिवाजीराव कोळी याच्या मार्गदर्शनाखाली ,महिला पोलीस अधिकारी गायत्री पाटील यांनी पीडित मुलीची कैफियत जाणून घेऊन गुन्हा दाखल केला आहे.शून्य नबरने गुन्हा विजयदुर्ग पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.

●पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल●

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी हा मुलीचा चुलतभाऊ असून त्याचे वय ३३ वर्ष आहे. तो विवाहित असून त्याला तीन मुले आहेत. अशा पुरुषाने केलेल्या या अत्याचाराचा सर्वच थरातून निषेध केला जात आहे. दरम्यान कणकवली पोलीसांनी त्याचेवर अल्पवयीन मुलीवर सातत्याने बलात्कार,मारण्याची धमकी, असे वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.त्याच प्रमाणे अल्पवयीन मुलीचे संरक्षण करणाऱ्या फॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page