वैभववाडी /-पती व मुलांच्या सोबत झोपलेली विवाहित महिला मध्यरात्री घरातून पळून गेली आहे.आयेशा जाबित नाचरे वय वर्षे 27 रा.कोळपे जमातवाडी असे तिचे नाव आहे.ही घटना 3 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास घडली.पत्नी नापत्ता असलेची फिर्याद पती जाबित उस्मान नाचरे वय वर्षे 30 यांनी वैभववाडी पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.
शनिवारी मध्यरात्री आपल्या कुटुंबातील पती व मुलांच्या सोबत झोपलेली विवाहित महिला कोणालाही जाग न दाखविता घरातून मध्यरात्री पळून गेली आहे.मध्यरात्री सासरा झोपेतून उठून बघितले असता मुलाच्या खोलीचा दरवाजा उघडा असल्याने सासऱ्याने डोकावून पाहता सून अंथरूनात दिसली नाही.त्यानंतर मुलाला वडिलांनी पत्नी बाबत विचारले असता पतीने सांगितले पत्नी जेवण झाल्यानंतर रात्री आपल्या सोबत झोपली होती.मात्र आपण झोपल्यानंतर पत्नी अचानक गायब झाली आहे. नातेवाईकां कडे शोधाशोध करूनही न सापडल्यामुळे ती नापत्ता असल्याची फिर्याद पतीने शनिवारी वैभववाडी पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.या घटनेचा तपास पोलीस नाईक योगेश तांडेल करीत आहेत.
फोटो:आयशा नाचरे