वैभववाडी /-
वैभववाडी तालुक्यातील महिला डॉक्टरच्या विनयभंग करणाऱ्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याला न्यालयाने जामिनावर मुक्तता केली आहे.
वैभववाडी तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला डॉक्टरचा विनयभंग केल्या प्रकरणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश पाटील यांना वैभववाडी पोलीसांनी शनिवारी सकाळी 11.30 वाजता अटक केली,त्यानंतर दुपारी त्यांना कणकवली न्यायालयात हजर केले. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील प्रमुख आरोग्य अधिकारी म्हणून न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.