ओरोस /-
आज दिनांक 3 ऑक्टोबर 2020 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कुडाळ तालुका सचिव राजेश टंगसाळी व अणाव सरपंच नारायण उर्फ आपा मांजरेकर यांच्या पुढाकाराने ओरोस जिल्हा रुग्णालय समोरील परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी साफसफाई सह जंतुनाशक औषध फवारणी केली. सद्यस्थित प्राधिकरण क्षेत्रातील बस थांबा परिसरात अतिशय अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. त्यात जिल्हा रुग्णालयासमोर अनेक जणांची ये जा असल्याने सदरील परिसरात कोरोना पार्श्वभूमीवर जंतुनाशक फवारणी गरजेची होती.जिल्ह्यात कोरोनाग्रस्त व त्यांच्या नातेवाईकांसाठी मदत केंद्राचे उभारून सामाजिक जाणिवेची अभिनव संकल्पना राबवणाऱ्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी याची तात्काळ दखल घेत जंतुनाशक फवारणीचा उपक्रम हाती घेतला.यावेळी मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे,तालुका सचिव राजेश टंगसाळी,अणाव सरपंच आप्पा मांजरेकर,विभाग अध्यक्ष प्रणील अवसरे, अनिल कसालकर,सर्वेश राणे,सुनील वरक,सचिन मयेेकर,प्रकाश माळवे आदी पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.मनसेच्या या अभिनव उपक्रमाचे परिसरातील रिक्षा चालक वाहक,हॉटेल व्यावसायिक,प्रवासी आदीनी आभार मानून समाधान व्यक्त केले.