हाथरस येथील घटनेचा संपूर्ण जिल्ह्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे निषेध.!

हाथरस येथील घटनेचा संपूर्ण जिल्ह्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे निषेध.!

अमिता मठकर /-

हाथरस येथील घटनेचा संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस महामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ निषेध आंदोलन करणार आहे.असे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी सांगितले.

उत्तर प्रदेश मधील हाथरस येथील दुर्दैवी घटनेतील दलित पिडीत मुलीला उद्या सकाळी ११ वाजता सिंधूदूर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मेणबत्ती प्रज्वलित करून श्रद्धांजली अर्पण करणार असल्याचे सांगून.या घटनेला जबाबदार असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा काळ्या फिती बांधून निषेध आंदोलन करणार. असल्याचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी सांगून. पिडीत कुटूंबाला न्याय मिळावा.तसेच पिडीत कुटुंबाच्या मागे संपूर्ण महाराष्ट्रातील जनता आहे.असे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी जाहीर केले.

अभिप्राय द्या..