सरपंच बापू फाटक यांच्या नेतृत्वाखाली आयनल ग्रामपंचायतने सार्वजनिक ठिकाणे केली चकाचक..!

सरपंच बापू फाटक यांच्या नेतृत्वाखाली आयनल ग्रामपंचायतने सार्वजनिक ठिकाणे केली चकाचक..!

कणकवली/-

आयनल ग्रामपंचायत तर्फे आयनल आरोग्य केंद्र, गावठण पुर्ण प्राथमिक शाळा, रोहिले वाडी पुर्ण प्राथमिक शाळा, पावणादेवी मंदिर आणि मनेरवाडी पुर्ण प्राथमिक शाळा, आयनल अंगणवाडी (गावठण, रोहिले वाडी,मनेरवाडी) येथील साफसफाई करण्यात आली.त्यामुळे आयनल गावातील सर्व सार्वजनिक ठिकाणे चकाचक झाली आहेत.त्यामुळे आयनल सरपंच बापू फाटक यांच्या आदर्शवत उपक्रमाचे सर्वच स्थरातून कौतुक होत आहे.हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी उपसरपंच लक्ष्मीकांत पेडणेकर, गावचे पोलिस पाटील दिलिप साटम, माजी सरपंच संतोष वायंगणकर, ग्रामसेवक सुशांत पाटील यांनी प्रयत्न केले.

तसेच गावचे स्वयंसेवक,पांडूरंग मसूरकर,आदेश ओटवकर,अशोक ओटवकर,मोहन लोके,भास्कर लोके,अशोक मगम,रंणजित मैस्त्री ,सिध्देश मैस्त्री,सुशील ओटवकर,तेजस ओटवकर,सिध्देश फाटक,वैभव मसूरकर,विट्ठल वायंगणकर,शैलेश वायंगणकर,सुधा दहिबावकर,गोविंद फाटक या सर्व स्वयंसेवक, आयनल ग्रामपंचायत कर्मचारी यांनी मेहनत केली.

अभिप्राय द्या..