✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.

सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकच्या तृतीय वर्ष मेकॅनिकल विभागाच्या 35 विद्यार्थ्यांची बजाज ऑटो लिमिटेडमध्ये कॅम्पस इंटरव्हयूद्वारे निवड करण्यात आली. टू व्हीलर व थ्री व्हीलर उत्पादनातील आघाडीची कंपनी बजाज ऑटोतर्फे हे इंटरव्हयू आयोजित करण्यात आले होते.

पुण्याजवळील आकुर्डी येथील उत्पादन प्रकल्पासाठी ही निवड झाली असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले व प्राचार्य गजानन भोसले यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page