✍🏼लोकसंवाद /- सिंधुदूर्ग.

दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वर्धापन दिनी फोंडाघाट येथील कृषी संशोधन केंद्राचे केंद्रप्रमुख डॉ.विजयकुमार नामदेव शेटये यांना कै.मुकुंद गणेश दांडेकर आणि आर. एफ.आर.एस.ॲक्लमेशन पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यपिठा चे माजी कुलगुरु डॉ. व्यंकट मायंदे,आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंत यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.डॉ. विजयकुमार शेटये यांनी कृषी विज्ञान शाखेमध्ये आणि उद्यानविद्या शाखेमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरी व योगदानाबद्दल हे दोन पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे. प्लास्टिक अच्छादनावरील भात,मधु मका,मुग लागवडीचे तंत्रज्ञान शेटये यानी विकसित केले असून त्यांचे संशोधन शिक्षण आणि कृषी विस्तार क्षेत्रामध्ये मोठे योगदान आहे.आज पर्यंत त्यांचे १३ संशोधनावर आधारित शिफारशी आहेत. रत्नागिरी२४, रत्नागिरी ५, रत्नागिरी ६, रत्नागिरी ७ रत्नागिर ८, ट्रॉम्बे कर्जत कोलम,कर्जत शताब्दी या भाताच्या जाती ,सह्याद्री ५ ही संकरित भात जात, कोकण भूरत्न ही भुईमुगाची जात दापोली ३ ही नाचणीची जात, कोकण सात्विक ही वरीची जात, आणि कोकण भेंडी ही भेंडीची जात विकसित करण्यामागे त्यांचे योगदान आहे. त्यांनी एकूण २८ संशोधनावर आधारित त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. शेतकऱ्यांनसाठी ७ मराठीतुन लेख प्रसिद्ध केले आहेत. २ दूरदर्शन आणि ७ आकाशवाणी कार्यक्रमातून त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे.नापणे येथे ऊस संशोधन केंद्र स्थापनेमध्ये त्यांचा सिंहाचावाटा आहे.या संशोधन केंद्रामुळे कोकणातील ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. शेटये हे नाधवड़े गावचे सुपुत्र आहेत विद्यापीठामध्ये त्यांनी २८ वर्षे वेगवेगळ्या पदावर काम केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page