कोल्हापूर /-

कोरोना व्हायरसने चीनच्या व्यूहान शहरातून प्रवास पूर्ण जगभरात थैमान घातले. जगभरात त्याचा प्रसार होत असताना आम्ही आमच्या देशात अगदी आलबेल जीवन जगत होतो, हा व्हायरस आपल्या देशात, गाव-शहरात आणि घरात कधी शिरकाव करेल याचा विचार ही करत नव्हतो. परंतु या व्हायरस ने आपल्याला कधी विळखा घातला काही समजलंच नाही. लॉक डाऊन आणि अनलॉकच्या फेऱ्यात जनता अडकली आणि दिवसागणिक बाधित होत राहिली, मरत राहिली…
या आजाराने गरीब-श्रीमंत, जवळचा-लांबचा असा कोणताही मतभेद न करता सर्रास सगळ्यांना ग्रासायला सुरुवात केली.

राजकीय व सामाजिक कार्यासाठी अहोरात्र झगडणारे, झटणारे व लोकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी रात्रंदिवस वेगवेगळ्या ठिकाणी फिरणारे आरपीआय(आ)चे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मा. उत्तम कांबळे दादा यांनाही कोरोनाची लागण झाली. लक्षणे दिसू लागली, दवाखान्यात दाखल केले गेले, तिसऱ्या-चौथ्या दिवशी तब्येत खूपच खालावली, अतिशय बिकट प्रसंग, काही काळासाठी जीवावर बेतलेला, अत्यवस्थ स्थिती, कोणत्याही कार्यकर्त्याला याविषयी कसलीही माहिती नाही, दवाखान्यात ड्रायव्हर सोबतीला, खालावलेली परिस्थिती पहातोय, डोळे पाण्याने भरलेले, दादा, परिस्थिती खूपच बिकट आहे कुणाला तरी कळवू आपण, तो म्हणतोय. आपण कोरोना बाधित आहोत हे जर आपल्या कार्यकर्त्यांना कळाले तर ते खूप दुःखी होतील, व्यथित होतील, आणि माझ्यामुळे कोणीही दुःखी अथवा व्यथित होऊ नये असे मला प्रामाणिकपणे वाटते, दादा. ड्रायव्हर हट्ट करतोय, पश्चिम महाराष्ट्र व कोल्हापूर जिल्हा कार्यकारीणी ला कळविले जाते. प्रा. शहाजी कांबळे सर, बाळासाहेब वाशिकर, राजू ठिकपुर्लीकर, अविनाश शिंदे यांची लगबग सुरू होते. दादांना कोरोना झाला आहे याविषयी कार्यकर्ते अनभिज्ञ आहेत इतकी ही गोष्ट गोपनीय ठेवली जाते. उपचार सुरू आहेत. औषधांना प्रतिसाद चांगला आहे. आठ दहा दिवसांत कोरोनावर मात केली जाते. हॅलो, दादा, जय भीम, कसे आहात? आपल्याला भेटायचं आहे. मी.सर, जय भीम. मी मजेत आहे. २५ तारखेनंतर भेटूया आपण. दादा. आवाज नेहमीसारखा खणखर जसं की काहीच झाले नाही… काल परत फोन केलाय. सर ३० तारखेनंतर भेटूया. आज मित्राचा फोन. दादा कोल्हापूर मध्ये येत आहेत.

आजपासून सामाजिक व राजकीय कार्यास पुनश्च सुरुवात करणार आहेत. कोरोनावर मात करून दादा पुन्हा शरीराने समाजसेवेसाठी हजर होणार म्हणून त्यांचं जंगी स्वागत जिल्हा कार्यकारिणी च्या वतीने आज बिंदू चौक कोल्हापूर येथे करण्यात आले. कोरोना विरुद्धची लढाई या योध्याने जिंकली आहे आणि पुन्हा छड्डू ठोकून हा ढाण्या वाघ मैदानात उतरतोय, मैदान जिंकण्यासाठी, मैदान गाजविण्यासाठी. तशी डरकाळी आज फोडली आहे. मृत्यू ला हरवून मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या या युद्धविराचे हार्दिक अभिनंदन व पुढील काळात त्यांचे आरोग्य सदृढ राहो ही त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांची मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी इच्छा बोलून दाखविली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page