कुडाळ /-

आज उद्यमनगरमधील डीपी बॉक्स बदलण्यात आला त्यांनतर आऊट सोर्स च्या कर्मचाऱ्यांनी ठेकेदाराच्या माणसांना आपण वीज पुरवठा सुरळीत करतो आपण जाऊ शकता असे सांगितले .परंतु ठेकेदाराची माणसे गेल्यानंतरही उद्यमनगर परिसरसतील वीज पुरवठा सुरळीत झाला नसल्याने वीज मंडळ कर्मचाऱ्यांना याची कल्पना देण्यात आली .त्यांनतर तेथे दाखल झालेल्या चव्हाण नामक आऊट सोर्स च्या कर्मचाऱ्यानी मुन्ना दळवी यांच्याकडे कुलूप मागितले व कुलूप घालून आपण जाणार आमची वीज पुरवठा सुरु करण्याची जबाबदारी नाही असे सांगितले व दरम्यान ठेकेदार बांदेकर यांची माणसे वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी आली त्यांनाही चव्हाण यांनी वीज पुरवठा सुरु करण्यास मज्जाव करत तुमची लायकी नाही तर कामे कशाला करता असा सवाल उपस्थित केला.

दरम्यान भाजपचे नेते निलेश तेंडुलकर घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी थेट अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांच्याशी संपर्क साधत झालेली घटना कळवली असे असूनही चव्हाण नामक कर्मचारी उद्दामपणे वागत होता. त्यानंतर कुडाळ अभियंता पाध्ये यांनी त्वरित वीज पुरवठा चालू करायला सांगितले आधीच भरमसाठ वीजबिलाने हैराण झालेल्या ग्राहकाना ठेकेदार व वीज मंडळ कर्मचारी यांच्यातील वैमनस्यामुळे दोन तासाहून अधिक काळ काळोखात रहावे लागले .उद्या अधीक्षक अभियंता विनोद पाटील या कर्मचाऱ्यावर काय कारवाई करतात यावर उद्यमनगरवासीयांचे लक्ष लागले असून ग्राहकांना वेठीस धरणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी उद्योजक करणार असल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page