✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

श्री सिद्धी गणपती चषक कविलकाटे भव्य नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत कुडाळ लक्ष्मीवाडी येथील सोहम तेजस स्पोर्ट्सने विजेतेपद पटकाविले. तर शारदा स्पोर्ट पावशी हा संघ उपविजेता ठरला. १८ ते २० मार्च या कालावधीत कविलकाटे येथील सिद्धी गणपती मंदिराजवळ ही स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेचे उद्घाटन नगरसेविका ज्योती जळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. तसेच कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी उपस्थिती दर्शवून शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेतील विजेता सोहंम तेजस स्पोर्ट्स संघाला रोख १५ हजार ०२३ रु. (जितेंद्र सावंत यांच्याकडून) आणि आकर्षक चषक (दिनेश गावडे यांच्याकडून) तसेच उपविजेत्या शारदा स्पोर्ट पावशी संघाला रोख १००२३ रु. ( नगरसेविका ज्योती जळवी यांच्याकडून) आणि चषक (समिल जळवी यांच्याकडून) प्रदान करण्यात आला. तर उपांत्य फेरीतील दोन्ही पराभूत संघाना २५०० रु. रोख बक्षीस अरविंद करलकर यांच्याकडून देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page